Sunday, January 12, 2014

आजचं महाराष्ट्र टाईम्सवरील 'नो पॅन्ट डे' ची बातमी वाचली. यात जगभारातील तरुण-तरुणी १२ जानेवारी हा दिवस विना पॅन्ट घालत साजरा केला. यामध्ये इतर देशांप्रमाणेच भारतातील बंगळूरू शहारातील काही तरुणांचाही फोटो आहे.

खरंच लाज वाटते... अनुकरण करायचं तर कशाच करावं एवढंही कळत नाही का... एवढीच पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायचं असेल तर... त्यांच्या संशोधनाचं कराव. त्यांच्या कलेचं करावं, त्यांच्याकडे एवढे चांगले गुण आहेत जे आपल्याला फायदेशीर ठरतील त्या गुणांचं अनुकरण करण्यापेक्षा.. ह्या असल्या थिल्लर 'no pant day, valentine day, rose day...etc" असल्या गोष्टींचे अनुकरण भारतीय करत आहेत... खरंच लाज वाटते...
आजकाल अनेक जण स्तूतीप्रियचं झालेत. त्यांची स्तूती केली की ते तासन् तास बोलतात, मात्र जर खरं बोलायला गेलं अथवा त्यांच्यातील कमतरता, वाईट गोष्टी एक मित्र या नात्यानं सांगायला गेलं की ते बोलणचं सोडतात...
खरंच किती खोटी स्तूती ऐकायची त्यांचा कानाला सवय लागली आहे..
एखादी नवीन गोष्ट आली की, त्याच्या सोबत चांगल्या आणि वाईट गोष्टीही येतात. मग आधुनिक जगात वावरत, त्याचा आनंद लुटत असताना त्याच्यातील संभाव्य धोकेही लक्षात घ्यायलाच हवे. एवढंच नाही तर त्यांच्या स्वीकारही करायला हवा...
उगाच आम्ही सुरक्षित नाही, मानसिकता बदलली आहे, व्याभिचार वाढलाय, संस्कार कमी पडताहेत
अशा फुटकळ गोष्टींचा गाजावाजा करु नये.
पुस्तकं ही माणसांना मार्गदर्शन करण्यासाठी असतात. मात्र अनेक जण पुस्तकातील जग हेच आपलं जग समजायला लागतात आणि तसंच जीवन जगायला जातात आणि फसतात...
मुळात पुस्तकांची निर्मिती का झाली? याचा अर्थ कळाला की, मग आपोआपचं पुस्तकातील अर्थ कळायला लागतात.
तुम्ही किती जास्त पावसाळे पाहिलेत या पेक्षा तुम्ही किती पावसात भिजलात हे जास्त महत्त्वाचे असते - राहुल
मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र मराठीचा प्रेक्षकसुध्दा आता वरकरणी गोष्टींनाच महत्त्व देतोय असंच वाटतं. एकीकडे ज्याप्रमाणे 'दुनियादारी' आणि 'टाईमपास' या चित्रपटांना प्रेक्षक लाभलाय, तर दुसरीकडे 'इनव्हेस्टमेंट'सारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट कधी आला आणि गेला हे अनेक मराठी भाषीकांना कळालचं नाही. यावरून आपण कोणत्या गोष्टींना महत्त्व देतोय हे लक्षात घ्यायला हवं.
आजकाल माणसापेक्षा पैसाच जास्त महत्त्वाचा झालायं. जो तो पैशालाच महत्त्व देतोय. या पैशाच्या जगात माणसला काहीच किंमत उरली नाही.
मात्र पैशाने चांगली माणसे मिळवता येत नाहीत. पैशासोबत आलेली माणसे पैशासोबतच निघून जातात.. हे लक्षात घ्यायला हवं.
''सच कडवा होता है।''
लहान पणी ऐकलेलं या वाक्याचा अर्थ .. आज मी जेव्हा कोणाशी खरं बोलायला लागतो तेव्हा कळतो...
जो पर्यंत महिलांना वाटात नाही मी सबल आहे... तोपर्यंत महिला असुरक्षितच आहेत...
कारण सबलिकरण हे आतूनच येत.. ते लादता नाही येत!

आपल्याच जीवन जगण्यातील चुकांमधून आपल्याला विविध अनुभव येतात, मग हेच अनुभव आपली विचारसरणी घडवतात, ही विचारसरणी नंतर जीवनातील तत्व बनून जाते. आणि मग कालांतराने हेच तत्वज्ञान आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग बनतात, जीवनाला योग्य दिशा दाखवतात..
- राहुल